धक्कादायक : नगर जिल्ह्यात एकाच दिवशी 9 कोरोना पॉझिटिव्ह
स्थानिक बातम्या

धक्कादायक : नगर जिल्ह्यात एकाच दिवशी 9 कोरोना पॉझिटिव्ह

Sarvmat Digital

संगमनेरचे 4, मुकुंदनगरचे 2 तर  विदेशी 2, जामखेड 1

अहमदनगर (प्रतिनिधी) –जिल्ह्याला हदरविणारा अहवाल पुण्यातून आज प्राप्त झाला. आज (गुरूवारी) तब्बल नऊ नवे कोरोना पॉझिटिव्ह पेशंट जिल्ह्यात निघाले. त्यात चार संगमनेरचे, दोन नगरमधील मुकुंदनगरचे तर दोन विदेशी, तर एक जामखेडचा नागरिक आहेत. या नव्या कोरोना पेशंटमुळे नगरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता 17 झाली आहे.

नगर जिल्हा प्रशासनाला ५१ अहवाल गुरुवारी दुपारी मिळाले. त्यात सहा कोरोना पॉझिटिव्ह निघाले. दुपारच्या अहवालात संगमनेर आणि मुकूंदनगरच्या प्रत्येकी दोघांचा सामावेश आहे.

आज सायंकाळी रात्री 9 वाजता 60 जणांचा अहवाल आला, त्यात 3 जण कोरोना बाधित आहेत. गुरुवारी दुपारी आलेल्या अहवालात 6 जण कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यामुळे आज एक दिवसातच 9 कोरोना पॉझिटिव्ह समोर आले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com