Friday, April 26, 2024
Homeनगरकोरोना : मुकुंदनगरमध्ये आरोग्य तपासणी करणाऱ्या परिचारिकांना मारहाण

कोरोना : मुकुंदनगरमध्ये आरोग्य तपासणी करणाऱ्या परिचारिकांना मारहाण

दोन स्वतंत्र गुन्हे दाखल; दोघांना अटक

अहमदनगर (प्रतिनिधी) – मुकुंदनगरमध्ये आरोग्य तपासणी करणाऱ्या दोन आरोग्य परिचारिकांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भिंगार कँम्प पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

दोन परदेशी कोरोना बाधित व्यक्तींनी मुकुंदनगरमध्ये वास्तव केल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे एकूणच प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाला असून मुकुंदनगर उपनगरात जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी सील केले आहे. फकीरवाडा, गणपती चौक, गोंविदपुरा या ठिकाणी पोलिसांनी नाका बंदी केली आहे. भिंगार पोलीस ठाण्याचे ३० पोलीस व एक शीर्घ कृती दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांकडून सहकार्य मिळत नसल्याचं दिसून येत आहे. सोमवारी सकाळी मुकुंदनगर आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. आरोग्य परिचारिका आरोग्य तपासणी करत असताना त्यांनी धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी दोन स्वतंत्र फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी सलीम अकबर शेख, रिहान रफिक शेख, रफिक इस्माईल शेख यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा, मारहाण, गैरवर्तन आदी कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. सलीम शेख व रफिक शेख यांना पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या