स्थानिक बातम्या

कोरोना – राज्यात चौथा बळी

Sarvmat Digital

मुंबई – नवी मुंबईतील वाशी खासगी रूग्णालयात एका कोरोना बाधिताचा मृत्यूने महाराष्ट्रात कोरोना बळींची संख्या 4 झाली आहे.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 130 वर पोहोचली आहे. 24 तासांत तब्बल 23 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मुंबई, सांगली, नवी मुंबई इत्यादी ठिकाणी कोरोनाच्या नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 649 वर पोहोचली आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये 112 रूग्ण आहेत. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे.

Deshdoot
www.deshdoot.com