Thursday, May 2, 2024
Homeनगरकोरोनाची लागण झालेल्या तीन रूग्णांची तब्येत स्थिर- जिल्हाधिकारी द्विवेदी

कोरोनाची लागण झालेल्या तीन रूग्णांची तब्येत स्थिर- जिल्हाधिकारी द्विवेदी

आतापर्यंत 211 व्यक्तींचे स्त्राव नमुने निगेटीव्ह

अहमदनगर (प्रतिनिधी)– जिल्ह्यातील 346 व्यक्तींची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे. तर 25 व्यक्तींना आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. एनआयव्हीकडे 236 जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यातील दोनशे अकरा जणांचे स्त्राव नमुने निगेटिव आल्याने त्यांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. कोरोनाची लागण झालेल्या त्या तीनही रुग्णांची तब्येत आता स्थिर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी दिवेदी यांनी मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर आणि आरोग्य विभागाच्या डॉक्टरांशी चर्चा करून या बाबींचा आढावा घेतला तसेच यापुढील काळात अधिकाधिक सतर्क राहून काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. त्यामुळे बाह्यरुग्ण तपासणीसाठी येणार्‍या व्यक्तींमध्येही या आजाराची लक्षणे बाह्य स्वरूपात दिसून येत असतील तर त्याचीही तपासणी करून त्यांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे.

अशा 79 जणांना आजअखेर देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान शहरात आढळलेल्या कोरोना बाधित पहिल्या रुग्णास उद्या चौदा दिवस पूर्ण होत आहेत. त्याचा स्त्राव नमुना उद्या एनआयव्हीकडे पाठविण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा पोलीस दल प्रयत्न करीत आहे.

त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रत्येक नागरिकाने या विषाणू संसर्गाचा धोका ओळखावा आणि सामाजिक बांधिलकी म्हणून तसेच स्वताच्या व समाजाच्या आरोग्यासाठी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या