हुडहुडीत वाढ; निफाड २.४ अंशावर तर नाशिकचा पारा ६ अंशावर
स्थानिक बातम्या

हुडहुडीत वाढ; निफाड २.४ अंशावर तर नाशिकचा पारा ६ अंशावर

Gokul Pawar

निफाड : यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात राज्यात सलग तिसर्‍यांदा सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात ६ अंश सेल्सीअस इतकी झाली आहे. तर निफाडचा पारा २.४ अशांवर आला आहे.त्यामुळे या सलग घसरत असलेल्या पार्‍यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे.

दरम्यान गुरुवारी (दि. १६) रोजी सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती.परंतु आज पुन्हा तापमान अघसरले असून नाही ६ भाषणावर तर निफाडचे तापमान २.४ अंश म्हणजेच बर्फ झाल्याचे दिसत आहे. देशाच्या उत्तरेकडील केंद्र शासित प्रदेश व शेजारील राज्यात बर्फवृष्टीमुळे या भागातील जनजीवन ठप्प झाले आहे. गेल्या तीन आठवड्यापासून हेच वातावरण असल्याने आलेल्या शितलहरीचा शेजारील राज्यात परिणाम जाणवत आहे. यामुळे विदर्भानंतर उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रकोप जाणवू लागला आहे.

राज्यात डिसेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात थंडीचे आगमन झाल्यानंतर अद्यापही राज्यातील विदर्भ-मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात थंडीचा मुक्काम कायम आहे. यंदा हिवाळ्याच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पारा ५ ते ६ अंशापर्यंत गेला होता. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातील पारा ११ ते १२ अंशावर गेला होता.

आता गेल्या तीन दिवसात पारा १५ अंशावरुन थेट ६ पर्यत घसरला आहे. या घसरलेल्या तापमानाचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे. नागपूरनंतर आता नाशिकला गेल्या तीन आठवड्यात आज चौथ्यांदा राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. पुन्हा एकदा  महाबळेश्वरपेक्षा कमी तापमान नाशिक जिल्ह्यात नोंदविले गेले आहे. अशाप्रकारे नाशिक जिल्ह्यात थंडीचा मुक्काम वाढला आहे.

थंडीचा पिकांवर परिणाम
तापमानात अचानक घट झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून द्राक्ष मन्यांना तडे जाणे, पाने कोरडी होणे असे प्रकार वाढणार आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी भल्या पहाटे बागेतगवत जाळून उष्णता तयार करीत आहे. मात्र हीच वाढती गहू, कांदा, हरभरा पिकासाठी पोषक ठरू लागली आहे

Deshdoot
www.deshdoot.com