नगर : शहर पोलिसांचा वेश्याव्यवसायावर छापा
स्थानिक बातम्या

नगर : शहर पोलिसांचा वेश्याव्यवसायावर छापा

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी ) – केडगावमधील अंबिका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून दोन तरूणींची सुटका केली.

तर, कुंटणखाना चालविणारे सचिन शिवाजी कोतकर (रा. केडगाव), सुनील मदन वानखेडे (रा. सारोळा ता. नगर) या दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंगळवारी अडीच वाजता करण्यात आली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com