Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपरराज्यातून नाशिककडे येणारया गुटख्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

परराज्यातून नाशिककडे येणारया गुटख्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाचे अधिसुचनेद्वारे मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखु तसेच आरोग्यास हानिकारक असणा-या खाद्य पदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणुक, वाहतुक आदी व्यवसायांना आळा घालुन त्यावर पुर्णपणे प्रतिबंध केलेला आहे. (दि. 07) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मुंबई आग्रा रोड वरील कोकणगांव फाटा परिसरात सापळा रचुन मालेगांव बाजु कडून नाशिक बाजुकडे येणारे आयशर वाहनावर छापा टाकुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुमारे 22 लाख 50 हजार रूपये किंमतीचा अवैध गुटखा व आयशर वाहन असा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन व्हावे यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी वेळोवेळी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.

- Advertisement -

त्यानुसार (दि. 06) रोजीचे रात्री 11 ते (दि. 07) रोजीचे पहाटे 05.00 वाजे दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व
कर्मचारी असे पिंपळगांव, ओझर परिसरात रात्रगस्त पेट्रोलींग करत असतांना स्था.गु. शा.चे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार मुंबई आग्रारोडवर मालेगांव बाजुकडुन एक आयशर ट्रकमध्ये काही इसम मध्य प्रदेश राज्यातुन नाशिक बाजुकडे अवैधरित्या गुटखा घेवुन येणार आहेत. या बाबत खात्रीशीर बातमी मिळाली.

त्या वरून स्था.गु.शा चे पथकाने लागलीच मालेगांव बाजुकडुन नाशिक बाजुकडे येत असलेल्या आयशर वाहन क्र. एमपी. 13 जी.ए 1433 या वाहनास कोकणगांव फाटयाजवळ नाकाबंदी करुन अडविले व वाहनावरील चालक नामे 1) नारायण राजाराम चौहाण (वय 35), 2) जिवन रमेश चौहाण (वय 30) दोन्ही रा. लाखापती मंदीर जवळ, रौउ ता. जि. इंदोर (मध्य प्रदेश) यांना जागेवरच ताब्यात घेण्यात आले. सदर आयशर ट्रकची झडती घेतली असता त्या मध्ये महाराष्ट्र राज्यात विक्री/उत्पादनास प्रतिबंध असलेला अवैध गुटखा मिळुन आला.

सदर छाप्यात केसर युक्त विमल पानमसाला, व्ही-1 सुगंधीत तंबाखु असा गुटखाच्या 72 गोण्यांमध्ये एकुण कि. रू. 22 लाख 50 हजार किंमतीचा गुटखा 07 लाख रू. किं.चा आयशर टेम्पो, तसेच इतर परच्युटन माल असा एकुण 33 लाख 24 हजार 656 रू. किं.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर कारवाईत जप्त केलेला अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखु व आयशर वाहन असे पुढील कारवाईसाठी अन्न

औषध प्रशासन विभाग नाशिक यांचे स्वाधीन केले आहे. सदरचा मुद्देमाल हा नाशिक जात होता याबाबत पोलीस माहिती घेत असुन भविष्यात देखील अशा प्रकारे प्रतिबंधीत गुटख्याची अवैधरित्या वाहतुक व विक्री करणा-या लोकांविरूध्द कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच (दि. 06) रोजी नाषिक

ग्रामीण पोलीसांच्या विषेश पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीवरून विशेष पथकाने पिंपळगाव शहरातील चिंचखेड रोड वरील राजेंद्र ट्रेडर्स दुकानाचे गोदामात छापा टाकला असता, सदर दुकानाचा मालक अविनाश बाळकृष्ण भामरे (वय 32) रा. पिंपळगाव ब. याचे कैंजात मानवी आरोग्यास अपायकारक गुटखा, सुगंधीत पान मसाला, तंबाखु जन्य पदार्थ असा एकुण 62,710 रू. किंमतीचा माल 10 प्लॅस्टीकचे गोण्यांमध्ये साठवलेला मिळुन आला.

सदर बाबत अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभागाचे निरीक्षक सोनवणे व त्यांचे पथक पुढील कार्यवाही करीत आहेत. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व विशेष पथकाने केलेल्या कारवाईत एकुण 33 लाख 87 हजार 366 रू. किं.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन भविष्यात अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार आहे. नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरतीसिंह मॅडम व अपर पोलीस अधीक्षक शर्मिश्ठा वालावलकर मॅडम, यांचे मार्गदर्षनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील,
स.पो.उ.नि. संजय पाटील, पो.ह.वा. कैलास देशमुख, पो.ह.वा. संजय गोसावी, पो.कॉ. सुषांत मरकड, पो.कॉ. सचिन पिंगळ, पो.कॉ. मंगेश  गोसावी, पो. कॉ. संदिप लगड यांचे पथक तसेच ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकातील अधिकारी पो.उ.नि. कल्पेश दाभाडे, पो.ना. प्रमोद जाधव, पो.षि. परिक्षीत निकम, पो.षि प्रकाश मोरे यांनी सदर कारवाई केली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या