पाकची पुन्हा आगळीक; गोळीबारात दोन जवान शहीद!
स्थानिक बातम्या

पाकची पुन्हा आगळीक; गोळीबारात दोन जवान शहीद!

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

श्रीनगर | वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुंछमध्ये गोळीबार केला आहे. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले असून दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. पुंछ जिल्ह्यातील गुलपूर सेक्टरमध्ये सकाळी अकराच्या सुमारास हि घटना घडली आहे. शहीद झालेले दोघेही जवान लष्करात पोर्टर म्हणून कार्यरत होते.

आर्मी पोर्टरवर हे जवान काम करत होते. त्यावेळी पाकिस्तानने अचानक गोळीबार करत मोर्टार डागले. त्यामुळे सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय लष्कराने या गोळीबाराची पृष्टी केली आहे. पाकिस्तानच्या सैन्याने विनाकारण गोळीबार केल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याला भारताकडून तीव्र उत्तर दिले जात आहे. भारताकडून जोरदार प्रत्युत्तर मिळत असल्यानेही पाकिस्तानकडून पुन्हा पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com