Friday, April 26, 2024
Homeनाशिकसीईटींच्या पूर्वतयारीसाठी ऑनलाईन परीक्षा

सीईटींच्या पूर्वतयारीसाठी ऑनलाईन परीक्षा

नाशिक । प्रतिनिधी

इंजिनिअरिंग, फार्मसी यांसह सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) आता ऑनलाईनच्या माध्यमातून घेतल्या जात आहे. तसेच शासनातर्फे अनेक परीक्षा, भरती प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपातच होत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षांचे स्वरूप माहिती व्हावे, तसेच परीक्षा पद्धतीबाबत माहिती व्हावी, या उद्देशाने मानवधन संस्थेच्या विविध शाळांमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून काही विषयांच्या परीक्षा घेण्यात आल्या. विशेष म्हणजे संस्थेतर्फे गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत असून यंदा संस्थेच्या तीन हजार मुलांनी ऑनलाईन परीक्षेचे धडे गिरवले.

- Advertisement -

संस्थेच्या धनलक्ष्मी बालविद्यामंदिर, प्राथमिक व माध्यमिक शाळा, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल, ब्राईट स्कूल या शाळांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षांचे महत्त्व समजावे तसेच परीक्षा पद्धतीची माहिती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येतो. यासाठी संस्थेच्या सर्व शाळांमध्ये संगणक लॅब कार्यान्वित करण्यात आल्या आहे. शालेय पातळीवर ऑनलाईन परीक्षांचा प्रयोग यशस्वीरित्या पार पाडत सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना यात सहभाग घेतला.

पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देत आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली. उच्च शिक्षणासाठी होणार्‍या सीईटी परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी संस्थेतर्फे राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा निश्चित भविष्यात विद्यार्थ्यांना फायदा होईल, असे संस्थेचे प्रमुख प्रकाश कोल्हे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या