Wednesday, April 24, 2024
Homeनाशिककांदा @ ६८००

कांदा @ ६८००

लासलगाव | वार्ताहर

शासनाच्या कांदा साठवणुकीवर होणाऱ्या कारवाईच्या संभाव्य भीतीने व्यापारी वर्गाने कांदा खरेदीत हात आखडता घेतल्याने सोमवारी सकाळी लाल कांदा दरात एकाच दिवशी २७०० ते ३००० रूपयांनी इतक्या वेगाने घसरण झाली. एकच वेळी भाव घसरले त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. लासलगांव बाजार समितीत सोमवारी सकाळी सत्रात शनिवारच्या तुलनेत जास्तीत जास्त भावात ३ हजार रुपये तर शुक्रवारच्या तुलनेत ४६०० रूपये कमाल भावात घसरण झाली. मात्र दुपार नतंर पुन्हा कांदा बाजार वधारुन जास्तीत जास्त ६८०० रुपये प्रति क्विंटल जाहिर झाले.

- Advertisement -

लाल कांद्याची आवक वाढत असताना कांदा आयात होत आहे त्यामुळे घाउक बाजरपेठेत दोन दिवसात ४६०० रूपयांनी कांदा भाव घसरल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे. दुसरीकडे महसूल विभागा मार्फ़त कांदा गोडावून मध्ये तपासणी केली जात असून याबाबतचा अहवाल दररोज शासनाच्या विभागाला पाठविला जात आहे.

यामुळे व्यापारी वर्गामध्ये घबराटीचे वातावरण आहे. येथील बाजार समितित ९३० वाहनातील ९०४५ क्विंटल लाल कांदयाला किमान २००० ते कमाल ४७०० रूपये तर सरासरी ६८०० रूपये भाव जाहीर झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या