लासलगाव : कालच्या जळीत प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड; अन्य तिघांवर गुन्हा दाखल
स्थानिक बातम्या

लासलगाव : कालच्या जळीत प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड; अन्य तिघांवर गुन्हा दाखल

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक | प्रतिनिधी
लासलगाव मधील जळीत प्रकरणातील मुख्य आरोपी रामेश्वर भागवत (रा. लासलगाव) गजाआड यास येवला येथून नाशिक ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी रामेश्वर भागवतसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
तसेच पिडीत महिलेला बाटलीत पेट्रोल देणारा पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कालपासून पोलिसांच्या अटकेत असलेले मुख्य आरोपी सोबतचे दोन्ही मित्र दत्तू जाधव आणि निलेश केंदळे केवळ संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात नेण्यात आले आहे.
काल झालेल्या लासलगाव बस स्टँँड येथील जळीत कांडातील मुख्य आरोपी रामेश्वर भागवत फरार होता.
Deshdoot
www.deshdoot.com