मनमाड : चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा निर्घृणपणे खून करून स्वता केली आत्महत्या
स्थानिक बातम्या

मनमाड : चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा निर्घृणपणे खून करून स्वता केली आत्महत्या

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

मनमाड :

संशयाला कोणतेही औषध नाही.. संशयामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहे. अशीच एक धक्कादायक घटना मनमाड पासून जवळ असलेल्या दहेगाव येथे घडली. चारित्र्यवर संशय घेत पतीने पत्नीचा निर्घृणपणे खून केल्यानंतर स्वतःला ही वाहनाच्या खाली झोकून आत्महत्त्या केली. दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पती नितीन कडनोर हा पत्नी सुनितावर नेहमी संशय घेत होता. यावरून त्यांच्यात अनेकदा भांडण होत होते. दोघांचे भांडण पोलीस स्टेशन पर्यंत गेले होते. मध्यंतरी नातेवाईकांनी समजूत काढल्यामुळे प्रकरण मिटले व दोघांचा संसार पुन्हा सुरू झाला होता.

मात्र नितीनच्या डोक्यात संशय जसाच तसा होता. अखेर आज सुनीता स्वतःच्या शेतात इतर महिला सोबत कांद्याची लागवड करीत असताना पती नितीनने तिच्यावर हल्ला करून डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले त्यात सुनीताचा जागीच मृत्यू झाला. पत्नीला ठार केल्या नंतर नितीनने गावातून जाणाऱ्या पुणे-इंदूर मार्गावर धाव घेऊन स्वतःला भरधाव वेगाने जाणाऱ्या एका वाहना खाली झोकून दिले त्यात त्याचा ही जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवले. सुनीता व नितीन  यांना एक मुलगा 2 मुली असून नितीन हा आई-वडिलांना एकुलता एक होता त्याच्याकडे भरपूर बागायत शेती असल्याने एका प्रकारे तो कोट्याधीश मानला जात होता. मात्र पत्नीवर घेतलेल्या संशयामुळे एक कुटुंब उध्वस्त झाल आहे.

Deshdoot
www.deshdoot.com