हरिश्चंद्रगड सर करताना मुंबईच्या गिर्यारोहकांचा मृत्यू
स्थानिक बातम्या

हरिश्चंद्रगड सर करताना मुंबईच्या गिर्यारोहकांचा मृत्यू

Sarvmat Digital

अकोले (प्रतिनिधी) – तालुक्यातील हरिश्चंद्र गड सर करीत असलेल्या मुंबई येथील 30 गिर्यारोहकांचे ग्रुपलिडर व प्रसिध्द ट्रेकर अरुण सावंत यांचा हरिश्चंद्र गडाचा कडा चढत असताना दोर तुटल्याने दरीत पडून मृत्यू झाला. काल शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.

मुंबई येथील 30 गिर्यारोहक हरिश्चंद्रगड ठाणे हद्दीतून सर करत असताना त्यांचा ग्रुप लिडर अरुण सावंत हे अचानकपणे बेपत्ता झाले. उर्वरित 29 गिर्यारोहक सुखरुप आहेत. अरुण सावंत आणि इतर असे 30 जण बेलपाडा येथून हरिश्चंद्रगड क्लाइम्ब करून चढत असताना त्यांच्या बरोबर जे 29 जण होते ते वरती आले आणि अरुण सावंत शेवटी क्लाइम्ब करून चढत असताना दोर तुटला आणि ते खोल दरीत पडले व त्यातच त्यांचा दुदैवी मृत्यू झाला.

हिमालयातील काही प्रसिद्ध ट्रेकर आणि पुण्यातील एक ट्रेकर ग्रुप अरुण सावंत यांच्या शोध घेत होते. काल रविवारी दुपारी रेड बुल रेस्क्यू टीमला त्यांचा मृतदेह मिळाला आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल अमोल आडे यांनी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com