Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकडीजे अत्याचारातील आठवा संशयित जेरबंद; प्रकाश वाघ यास पोलीस कोठडी

डीजे अत्याचारातील आठवा संशयित जेरबंद; प्रकाश वाघ यास पोलीस कोठडी

नाशिक । प्रतिनिधी

दरी मातोरी येथील डीजे अत्याचार प्रकरणातील आठव्या संशयितास पोलिसांनी जेरबंद केले. रविवारी पकडलेल्या वाघ यास न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. परंतु या प्रकरणातील मुख्य सूत्रधार संदेश काजळे मात्र अद्याप फरार आहे.

- Advertisement -

तालुक्यातील दरी मातोरी येथील फार्महाऊसवर आयोजित केलेल्या गुंडांच्या वाढदिवासाच्या पार्टीत गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटे डीजे सिस्टीम व आवाज चांगला नाही, अशी कुरापत काढून गुंडांनी दोन डीजेवादक युवकांवर रात्रभर अनैसर्गिक अत्याचार केले होते. या टोळक्यापैकी फार्महाऊसचा मालक निखिल पवार, प्रीतेश काजळे, संदेश वाघ, अभिषेक शिरसाट, रोहित डोळस, संदीप भवाळकर या सहा संशयितांना ग्रामीण पोलीस दलाने शनिवारी अटक केली होती. या सर्वांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. आहे. तर पोलिसांनी रविवारी प्रकाश वाघ यास अटक केली होती. त्यासही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, आज ग्रामीण पोलिसांनी शिताफिने आठवा संशयित ओंकार ऊर्फ सिंधू राजू मथुरे (26, रा. नवीन नाशिक) यास अटक केली.
संदेश काजळे याने वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त फार्महाऊसवर डीजे वाजवण्याची सुपारी पंचवटीतील शिंदे म्युझिक सिस्टिमला दिली. गुरुवारी रात्री दोन डीजेचालक डीजेसह दरी मातोरी येथील फार्महाऊसवर आले. वाढदिवसाची पार्टी गुरुवारी रात्री 9 ते मध्यरात्री 3 वाजेपर्यंत चालू होती. डीजे सिस्टिम व आवाज चांगला नाही, असे म्हणत टोळक्याने दोघांना विवस्त्र करत मारहाण केली.

त्यानंतर एकमेकांवर अनैसर्गिक अत्याचार करण्यास भाग पाडले. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शनिवारपासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी शनिवारी फार्महाऊसवरून आरोपींविरोधात पुरावे गोळा केले असून फरार काजळेचा शोध सुरू असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

पोलीस ठाण्यात गर्दी

डीजे प्रकरणातील 7 संशयितांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. हे सर्व संशयित तालुका पोलीस ठाण्यातील कोठडीत असून त्यांना भेटण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात दररोज मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. यामध्ये अनेक सराईतांशी लागेबांधे असणार्‍यांची मोठी संख्या असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या