Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकआडवाडी येथे बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार

आडवाडी येथे बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार

शेनीत | त्र्यंबक जाधव
ठाणगावजवळील आडवाडी खालची येथे बिबट्याने भरदिवसा गाईवर हल्ला करुन गायीला ठार केल्याची घडना सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.आडवाडी खालची येथील तुकाराम बहिरु बिन्नर हे आपल्या घरासमोर जनावरे चरत असताना बिबट्याने चारच्या सुमारास गाईचा फडशा पाडला. तुकाराम बिन्नर यांच्या मुलाने बिबट्याला पळविण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु बिबट्याने त्यांच्या आवाजाला दाद दिली नाही.
बिबट्याने गायीचा पूर्ण फडशा पाडल्यानंतरच त्या ठिकाणाहून पलायन केले. बिबट्याने जनावरांच्या कळपावर अचानक हाल्ला केल्याने कळपातील जनावरे बिबट्याच्या भीतीपोटी सैरावैरा पळत होती. आपल्या डोळ्यांदेखत बिबट्याने गाईचा फडशा पाडला असल्याने बिन्नर कुंटूब या हल्ल्यामुळे पूर्णपणे घाबरलेले आहे. वनविभागाच्यावतीने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा आशी मागणी ग्रामस्थाच्यावतीने करण्यात येत आहे.ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगावजवळील आडवाडी खालची येथे बिबट्याने भरदिवसा गाईवर हल्ला करुन गायीला ठार केल्याची घडना सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.
आडवाडी खालची येथील तुकाराम बहिरु बिन्नर हे आपल्या घरासमोर जनावरे चरत असताना बिबट्याने चारच्या सुमारास गाईचा फडशा पाडला. तुकाराम बिन्नर यांच्या मुलाने बिबट्याला पळविण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु बिबट्याने त्यांच्या आवाजाला दाद दिली नाही. बिबट्याने गायीचा पूर्ण फडशा पाडल्यानंतरच त्याठिकाणाहून पलायन केले. बिबट्याने जनावरांच्या कळपावर अचानक हाल्ला केल्याने कळपातील जनावरे बिबट्याच्या भीतीपोटी सैरावैरा पळत होती. आपल्या डोळ्यांदेखत बिबट्याने गाईचा फडशा पाडला असल्याने बिन्नर कुंटूब या हल्ल्यामुळे पूर्णपणे घाबरलेले आहे. वनविभागाच्यावतीने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा आशी मागणी ग्रामस्थाच्यावतीने करण्यात येत आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या