Photo Gallery :  देशदूत तेजस पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न
स्थानिक बातम्या

Photo Gallery :  देशदूत तेजस पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक ।  प्रतिनिधी

गेल्या दोन महिन्यांपासून उत्सुकता लागून असलेल्या ‘देशदूत’ तेजस पुरस्काराचे वितरण आज शुक्रवारी (दि. ०६) रोजी ‘देशदूत’ कार्यालयात पार पडले. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यशवंतांना गौरविण्यात आले. यावेळी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी केले. या वेळी त्या म्हणाल्या कि, देशदूत अनेक वर्षांपासून समाजातील अनेक यशवंताना, गुंवात्ताना सन्मानित करत आले आहेत. तीच परंपरा अजून देखील सुरु आहे.

त्या नंतर प्रमुख पाहुणे नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतना म्हटले कि, यश म्हणजे काय, तर जेव्हा कोणी आपल्याला एकट्यात विचारले कि तुम्ही यशस्वी झाला आहात का, आणि उत्तर जर हो असेल तर तुम्ही यशस्वी झाला आहात.

प्रत्येक क्षेत्रातून प्रत्येकी दोन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये एक परीक्षक पुरस्कार आणि एक सर्वाधिक पसंतीच्या मतांचा पुरस्काराचा समावेश होता.

यावेळी दोन विशेष पुरस्कारार्थींनादेखील गौरविण्यात आले. यामध्ये वैद्य विभव येवलेकर आणि प्रवीण कमळे यांचा समावेश होता.

या पुरस्कारामध्ये नामांकने मागवण्यात आली होती. तद्नंतर उत्कृष्ट नामांकनांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. मुलाखती लिखित आणि ‘देशदूत’च्या संकेतस्थळावर व्हिडिओसह प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. यानंतर याच पुरस्काराचा एक भाग म्हणून ‘देशदूत’च्या www.deshdoot.com ला संकेतस्थळावर दहा दिवस ऑनलाईन मतदान प्रक्रियादेखील घेण्यात आली होती. यामध्येही जवळपास 72 पेक्षा अधिक देशातील युजर्सने या मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. हा आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक ठरला आहे.

यावर्षी सहा क्षेत्रांमधून नामांकने मागवण्यात आली होती. यामध्ये सेल्फ सस्टेन्ड बिझनेस, सामाजिक/सांस्कृतिक, फायनान्स, विधी, वैद्यकीय व प्रगतिशील शेती या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला होता. यामधील प्रत्येक नामांकनप्राप्त युवकाची अनोखी भूमिका, अनोखी कथा आहे.

प्रत्येकानेच आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अशा या यशवंतांचा गौरव समारंभ ‘देशदूत’ कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने या पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘देशदूत’ तेजस पुरस्कार वितरणाच्या दिवशी ‘यश’ या विषयावर विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, लाईफ कोच मंदार राजेंद्र, ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉ. शिरीष सुळे आणि नगरसेविका हिमगौरी आडके-आहेर यांची उपस्थिती होती.

अशी झाली निवड प्रक्रिया

युवकांनी दिलेल्या मुलाखतीतून आणि त्यांचा व्हिडिओ बघून परीक्षकांच्या माध्यमातून पारदर्शकपणे निवड प्रक्रिया राबवण्यात आली होती. यानुसार प्रत्येक कॅटेगिरीतील एका पुरस्कार विजेत्याचे नाव परीक्षांकडून देण्यात आले. तसेच ‘देशदूत’च्या  www.deshdoot.com या संकेतस्थळावर घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेतून सर्वाधिक पसंतीक्रम मिळवलेल्या युवकांस ऑनलाईन क्षेत्रातील पुरस्कार प्रदान केला गेला.

या कॅटेगिरीतून हे आहेत पुरस्कारार्थी

सेल्फ सस्टेन्डमधून : ऑनलाइन विजेते : युगंधर तुपे

                              ज्युरी विजेते :  परेश चिटणीस

सामाजिक, सांस्कृतिकमधून : ऑनलाइन विजेते : सुजित काळे

                                         ज्युरी विजेते : जगबिर सिंग

फायनान्समधून : ऑनलाइन विजेते : पीयूष चांडक

                          ज्युरी विजेते : विशाल पोद्दार

लॉयर्स कॅटेगिरीतून : ऑनलाइन विजेते : अँड. पंकज चंद्रकोर

                             ज्युरी विजेते : अँड. प्रवर्तक पाठक

वैद्यकीयमधून : ऑनलाइन विजेते : डॉ. वैभव पाटील

                        ज्युरी विजेते : डॉ. चंद्रशेखर पेठे

प्रगतिशील शेतीमधून : ऑनलाइन विजेते : अक्षय देवरे

                                 ज्युरी विजेते : भाऊसाहेब मते

तेजस विशेष पुरस्काराचे मानकरी

1. प्रवीण कमळे

2. वैद्य विभव येवलेकर

Deshdoot
www.deshdoot.com