औरंगाबादमध्ये करोनाचा रुग्ण आढळला; राज्यातील संख्या ३२ वर

औरंगाबादमध्ये करोनाचा रुग्ण आढळला; राज्यातील संख्या ३२ वर

मुंबई : पुणे, मुंबई, नगर नंतर आता औरंगाबादमध्येही करोनाचा रुग्ण आढळला आहे. औरंगाबादमधील हा पहिलाच करोनाचा रुग्ण असून कालपर्यंत ३१ वर असलेली कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

दरम्यान औरंगाबादमध्ये एका ५९ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. या महिलेचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला विलगीकरण कक्षात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. ही महिला रशिया आणि कझाकिस्तानचा प्रवास करून आली असल्याचं सांगण्यात येत. या महिलेला धूत रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण आढळल्याने येथील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता या विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये, सिने-नाट्यगृह, मॉल्स, जिम आणि स्विमिंग पूल्स 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ३२
पुणे १५
मुंबई ५
पनवेल १
कल्याण १
नवी मुंबई १
नागपूर ४
ठाणे १
यवतमाळ २
नगर १
औरंगाबाद १

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com