Thursday, April 25, 2024
Homeनगरकरोना – राज्यात आतापर्यंत ५ हजार १०५ कैद्यांची सुटका

करोना – राज्यात आतापर्यंत ५ हजार १०५ कैद्यांची सुटका

मुंबई – करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील विविध कारागृहातून आतापर्यंत 5 हजार 105 कैद्यांना तात्पुरत्या जामीनावर सोडण्यात आले आहे.

कारागृह विभागाकडून अजून जवळपास 3 हजार कैद्यांना टप्याटप्याने सोडले जाणार आहे. करोनामुळे कारागृहात असणार्‍या  कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार  कैद्यांना तातडीने पॅरोल आणि तात्पुरत्या जामिनावर सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार राज्यातील विविध कारागृहातून मार्चपासून कैद्यांना सोडण्यात येत आहेत. त्यानुसार 27 मार्च पासून 2 मेपर्यंत 5 हजार 105  कैदी सोडण्यात आले आहेत. मात्र देशविरोधी कारवाया, पोस्को, अंडर ट्रायल आणि शिक्षा भोगणारे कैद्यांना घरी सोडण्यात आले नाही. मात्र, त्यानतरही काही कारागृहात मर्यादेपेक्षा अधिक कैदी असल्याने नवीन बंदीवानांची दुसरीकडे व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील विविध कारागृहामध्ये बंदी क्षमता 24 हजारावर आहे. परंतु, वेगवेगळ्या गुन्ह्यात जेरबंद केलेल्या जवळपास 35 हजाराहून अधिक बंदीवान कारागृहात आहेत. करोनामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार 5 वर्षाखालील शिक्षा असणारे तसेच किरकोळ गुन्ह्यातील कैदी सोडले जात आहेत.

- Advertisement -

करोना आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर संबंधित कैद्यांना पुन्हा त्यांना न्यायालयात बोलविले जाणार आहे. राज्यातील एकूण 8 हजार  कैद्यांना सोडण्यात येणार आहे. आतापर्यंत 5 हजारांवर कैदी सोडण्यात आले असून उर्वरित तीन हजारांवर कैद्यांना जामीनवर सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिक्षा झालेले कैदीही सोडण्यासाठी कारगृह प्रशासन न्यायालयात प्रयत्न करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या