नगर : हूश्श…. आणखी 45 नमुने निगेटिव्ह !
स्थानिक बातम्या

नगर : हूश्श…. आणखी 45 नमुने निगेटिव्ह !

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील संशयित कोरोना बाधीत 45 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्यावतीने शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील 145 संशयीत कोरोना बाधीतांचे घशातील द्रावाचे नमुने घेवून ते तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेत पाठविले होते. हे सर्व नमुने निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप मुरंबीकर यांनी दिली. यात गुरूवारी पाठविण्यात आलेल्या 45 नमुने देखील निगेटिव्ह असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यात कोरोना बाधीत पहिल्या व्यक्तींचा दुसरा नमुना देखील शुक्रवारी निगेटिव्ह आला असून आज तिसरा नमुना घेवून तो पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. शनिवारी जिल्हा बंदच्या दुसर्‍या दिवशी ग्रामीण भागासह नगर शहरात नागरिकांनी घरात राहणे पसंत केले. अपवाद वगळता काही ठिकाणी नागरिकांनी गर्दी करण्यास सुरूवात केली होती. नगर तालुक्यातील जेऊर येथे आठवडे बाजार भरविण्यात आला होता, याची माहिती तातडीने प्रशासनाला देण्यात आली. नमुने निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींना घरात निगराणी खाली ठेवण्यात येत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com