१६ हजारावर नाशिककर वैद्यकिय पथकाच्या नियंत्रणाखाली; दररोज चार हजार घरांचे सर्वेक्षण

नाशिक : करोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्यातील आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी बनला असुन वाढता आकडा व मृत्युची वाढत्या संख्येने सर्वाची काळजी वाढली आहे.

आता नाशिकचा आकडा वाढत चांलला असुन वाढत्या संक्रमणामुळे शहरातील रुग्णांचा आकडा ३६६ पर्यत पोहचला आहे. या वाढत असलेल्या रुग्णांमुळे शहरातील प्रतिबंधीत परिसर व इमारती – बंगला यांचा आकडा १२० पयत गेला असुन यापैकी ७९ क्षेत्रातील निर्बंध कायम आहे.

परिणामी या भागातील १६ हजारावर नागरिक वैद्यकिय पथकांच्या नियंत्रणाखाली असुन १२७ पथकांकडुन दररोज ४ हजार घरांचे सर्व्हेक्षण केले जात आहे. महापालिका क्षेत्रात पहिला करोना रुग्ण ६ एप्रिल २०२० रोजी आढळला होता.

यानंतर ३० एप्रिल पर्यत केवळ १० करोना रुग्ण होते. तर हे रुग्ण राहत असलेल्या भागात केवळ ६ प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करण्यात आले होते. यानंतर मे महिन्यात १८० करोना बाधीत आढळून आले असुन या काळात ६४ परिसर व इमारती – बंगले प्रतिबंधीत क्षेत्र निर्माण झाले होते. नंतर करोना रुग्णांचा वाढत्या संसर्गाने जुन महिन्याच्या ६ दिवसात १७३ रुग्ण आणि ४८ परिसर व इमारती – बंगले हे प्रतिबंधीत क्षेत्र तयार झाले आहे. अशाप्रकारे जुन महिन्यात करोनाचा मोठ्या प्रमाणात आणि गुणाकाराच्या स्वरुपाने करोना प्रादुर्भाव होऊन लागल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधीत रुग्ण राहत असलेल्या परिसरातील आणि इमारत किंवा बंगल्यातील व्यक्तींचा सध्या महापालिका डॉक्टरांच्या १२७ पथकांकडुन दररोज घरोघरी जाऊन आरोग्य सर्व्हेक्षण केले जात आहे. या पथकांकडुन सद्या शहरातील ७९ परिसर व इमारती – बंगल्यातील सुमारे ४ हजार ८४ घरांचे सर्व्हेक्षण केले जात आहे.

याठिकाणी राहत असलेल्या नागरिकांची संख्या १६ हजार ११५ इतकी आहे. पहिल्या ते १२० व्या प्रतिंबंधीत क्षेत्रात झालेल्या आरोग्य सर्व्हेक्षणातून आत्तापर्यत ७९६ संशयितांना रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. आता शहरात झोपडपट्टी भागात रुग्ण वाढत असल्याने याभागातील सर्व्हेक्षण सुरू केले आहे. अशाप्रकारे महापालिकेकडुन करोना संक्रमण रोेखण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *