परदेशी नागरिकाचा 14 दिवसानंतरचा पहिला अहवाल पॉझिटिव्ह
स्थानिक बातम्या

परदेशी नागरिकाचा 14 दिवसानंतरचा पहिला अहवाल पॉझिटिव्ह

Sarvmat Digital

जिल्ह्यातील 69 स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी 69 स्त्रावांचे अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, 14 दिवसांपूर्वी कोरोना बाधीत असणार्‍या आयवरी कोस्ट येथील परदेशी नागरिकांचा दुसरा नमुना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.

पुण्याच्या लष्कराच्या महाविद्यालयाने सोमवारी रात्री उशीरा 16 जणांचे तर मंगळवारी सकाळी 53 जणांचे अहवाल जिल्हा रुग्णालयाला पाठविले. हे सर्व 69 अहवाल निगेटिव्ह होते. दरम्यान मंगळवारी सायंकाळी पुण्यावरून आलेल्या अहवालात 14 दिवसांपूर्वी कोरोना बाधीत असणार्‍या आयवरी कोस्ट येथील परेदशी नागरिकांचा 14 दिवसांचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आरोग्य विभागात पुन्हा खळबळ उडाली असून आता पुन्हा संबंधीत परेदशी नागरिकावर बुथ हॉस्पिटल सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच पुन्हा 7 दिवसांनी त्याचा नमुना घेवून तो तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

ऑक्सीनजनचे प्रमाण कमी झाल्याने कोपरगावच्या रुग्णाचा मृत्यू कोपरगाव येथील या महिलेचा अहवाल दि. 10 एप्रिल रोजी कोरोना बाधीत असल्याचा अहवाल पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाला होता. त्यानंतर त्या महिलेला बूथ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने आणि रक्तदाब वाढल्याने त्याच दिवशी तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते.

तिच्या शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण हे 90 टक्केपेक्षा कमी असल्याने तिला कोविड-19 च्या रुग्णांसाठीच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. तेथे तिच्यावर औषधोपचार सुरु होते. सोमवारी रात्री 10-30 वाजता या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवून गरजेप्रमाणे औषधोपचार करण्यात आला आले. मात्र, औषधोपचाराला प्रतिसाद न दिल्याने मंगळवार (दि.14) महिलेची प्राणज्योत माळवली असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com