लासलगाव : जळीतकांडातील महिलेचा मुंबईत मृत्यू; ६७ टक्के भाजली होती महिला
स्थानिक बातम्या

लासलगाव : जळीतकांडातील महिलेचा मुंबईत मृत्यू; ६७ टक्के भाजली होती महिला

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक l प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील व निफाड तालुक्यातील लासलगावमधील जळीतकांडातील महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास या महिलेचा उपचारादरम्यान मुंबईतील मसिना रुग्णालयात मृत्यू झाला.

सहा दिवस या महिलेची मृत्यूशी झुंज अखेर संपली. मध्यरात्री शवविच्छेदन करुन, पहाटे तिचा मृतदेह मुंबईहून तिच्या गावी रवाना करण्यात आल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त झाली.

या महिलेला १५ फेब्रुवारीलाला एसटी स्थानकावर अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना घडली होती. या घटनेत ही महिला ६७ टक्के भाजली होती.

तिच्यावर सर्वात आधी लासलगावमधल्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून, नंतर तिला पुढच्या उपचारांसाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

यानंतर या महिलेला मुंबईतील मसिना बर्न स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणी संशयित आरोपी रामेश्वर भागवत, पेट्रोल पंप व्यवस्थापक आणि पंप कर्मचारी आकाश शइंदे या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com