नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीवर कोणत्या पक्षाचे किती सदस्य? जाणून घ्या सविस्तर
स्थानिक बातम्या

नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीवर कोणत्या पक्षाचे किती सदस्य? जाणून घ्या सविस्तर

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

स्थायी समिती सदस्यांचा कार्यकाल संपल्याने आज स्थायी समितीवर नव्या सदस्यांची नावे महापौर सतीश कुलकर्णी यांनी जाहीर केली.यावेळी भाजपकडून हेमंत शेट्टी, वर्षा भालेराव, राकेश दोंदे व सुप्रिया खोडे यांच्या नावांची घोषणा झाली.

शिवसेनेने तीन सदस्यांची नावे दिली होती त्यापैंकी सत्यभामा गाडेकर आणि सुधाकर बडगुजर यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. कॉंग्रेसकडून राहुल दिवे आणि राष्ट्रवादीकडून समीना मेमन यांना स्थायी समितीवर घेण्यात आले आहे.

तर आज भाजपचे उद्धव निमसे, दिनकर पाटील पुष्पा आव्हाड व भाग्यश्री ढोमसे यांचा कार्यकाल संपला. तर सेनेच्या संतोष साळवे, संगीता जाधव यांच्यासह कॉंग्रेसचे समीर कांबळे व राष्ट्रवादीच्या सुषमा पगारे यांचाही कार्यकाल संपल्याने त्यांच्या जागी नव्या सदस्यांची निवड महापौरांनी केली.

Deshdoot
www.deshdoot.com