Friday, April 26, 2024
Homeजळगावखान्देश गारठला…

खान्देश गारठला…

नंदुरबार – 

वातावरण निवरताच थंडीने आपला इंगा दाखवायला प्रारंभ केला असून संपूर्ण खान्देश गारठला आहे.खान्देशातील तीनही जिल्ह्यातील तापमानाचा पारा नीचांकी स्तरावर आला आहे.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातले या हंगामातील सर्वात कमी तापमान नोंदवंले गेले. जळगावचा पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला तर धुळे जिल्ह्यात या हंगामातील सर्वाधिक कमी तापमान 10.04 सेल्सियस नोंदवला गेले.

नंदुरबार जिल्ह्याचा तापमानाचा पारा खाली घसरला आहे. गेले काही दिवस ढगाळ वातावरण असताना अचानक तापमानाचा पारा खाली आल्याने थंडीची हुडहुडी चांगलीच वाढलीय.

या थंडीचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे. तर वाढत्या थंडीमुळे जनजीवन काही अंशी विस्कळीत झाले.खान्देशात यापूर्वी पिकांचे खूप नुकसान झाले आहे, त्यामुळे रब्बीचा हंगाम चांगला येईल, याकडे सर्वांचे  लक्ष लागून आहे, पण काही दिवसांपूर्वीच खान्देशातील काही भागात रिमझिम पाऊस झाला आहे. खान्देशात थंडीचा जोर वाढल्यानंतर भरीत पार्ट्या रंगू लागतात. विशेष म्हणजे जळगाव आणि धुळे जिल्ह्यात या पार्ट्या होतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या