जस्टीस लोया प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्याचे गृहमंत्र्यांचे संकेत
स्थानिक बातम्या

जस्टीस लोया प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्याचे गृहमंत्र्यांचे संकेत

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मुंबई | वृत्तसंस्था  

नागपूरमधील जस्टीस लोया मृत्युप्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्याचे संखेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. ठोस पुरावे असल्यास किंवा याबाबत कुणी तक्रार केल्यास राज्य सरकार दिवंगत न्यायाधीश ब्रीजगोपाल हरीकिशन लोया मृत्यू प्रकारणाची फाईल री-ओपन करू शकते असे संकेत दिल्याचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे.

सीबीआय न्यायालयाचे न्यायधीश लोया यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे १० वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवण्यात यावी या विनंतीसह दाखल करण्यात आलेलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली.

मात्र, गरज भासली तर किंवा तक्रार दाखल झाली तर ठाकरे सरकार याप्रकरणाची फाईल पुन्हा उघडेल असे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. तसेच कॅबिनेट कामगार मंत्री नवाब मलिक यांनीही याबाबतचे विधान केले आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मागणी असेल किंवा गरज असेल तर लोया प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करावी असे मांडले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की लोया प्रकरण अधिक माहिती नाही, केवळ वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या वाचल्या आहेत. त्यामुळे कुणावर थेट आरोप करणे चुकीचे आहे. त्यामुळे कुणी तक्रार केल्यास किंवा काही पुरावे दिल्यास ही फाईल पुन्हा उघडू शकते.

ठाकरे सरकारच्या महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या ताब्यात गृहमंत्रीपद आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश  लोया यांच्याकडे सोहराबुद्दीन चकमकीची सुनावणी होती. याकाळात त्यांना अनेक धमक्याही आल्या होत्या. एका बैठकीदरम्यान २०१५ मध्ये त्यांच्यावर विषप्रयोगदेखील झाला असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com