पत्रकारिता, सोशल मीडिया अभ्यासक्रमास लवकरच सुरुवात

देशदूत माध्यम समूहाचा उपक्रम

नेहमीच वेगवेगळे प्रयोग राबवणार्‍या देशदूत माध्यम समूहातर्फे नवीन काळाशी सुसंगत ठरणार्‍या दोन अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. या अभ्यासक्रमांना उर्त्स्फूत प्रतिसाद मिळत आहे. आता मोजक्याच जागा शिल्लक असून प्रत्यक्ष अभ्यासक्रमास लवकरच सुरुवात होणार आहे.

लॉकडाऊन काळाचा सदुपयोग करण्यासाठी देशदूतने ओळख पत्रकारितेची व सोशल मीडिया या अभ्यासक्रमांची रचना केली आहे. या अभ्यासक्रमाची घोषणा होताच अनेकांनी त्यासंदर्भात विचारणा केली. तसेच http://deshdoot.org/course/ या बेबाइटवर जाऊन आपले प्रवेश निश्चित केले आहेत. आता मोजक्याच जागा शिल्लक आहेत. यामुळे इच्छुकांनी त्वरीत नोंदणी करुन नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमात आपला सहभाग नोंदवावा. दोन्ही अभ्यासक्रमात त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. ऑनलाईन पध्दतीने हे अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत.

ओळख पत्रकारितेची अभ्यासक्रमात पत्रकारिता, बातमीचे लिखाण, लेखन कौशल्य, वृत्त संकलन, ग्रामीण पत्रकारिता, ब्लॉग लिखाण आदी विषय शिकविण्यात येणार आहेत. सोशल मीडिया अभ्यासक्रमात इंटरनेट, सोशल मीडिया, फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, यू-ट्यूब, वेबसाइट, ब्लॉग, सिटिजन जर्नालिस्ट, विविध बिले ऑनलाईन भरणे आदी विषय शिकवण्यात येणार आहेत.
प्रत्येक अभ्यासक्रमाचे शुल्क एक हजार रुपये आहे.

दोन्ही अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यास 300 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंबंधी अधिक माहितीसाठी 9423487920 या क्रमांकावर संपर्क साधावा.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com