झारखंडमध्ये कॉंग्रेसची मुसंडी; भाजप विरोधी बाकावर
स्थानिक बातम्या

झारखंडमध्ये कॉंग्रेसची मुसंडी; भाजप विरोधी बाकावर

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

रांची | वृत्तसंस्था

महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा मिळूनही विरोधी बाकावर असलेल्या भाजपवर झारखंड देखील गमावण्याची नामुष्की ओढवली आहे. कॉंग्रेसने ३८ जागांवर विजय मिळवला तर भाजपची गाडी ३१ जागांवर अडली आहे. तिकडे झारखंड मुक्ती मोर्चाला तीन जागा मिळाल्या आहेत तर इतर आणि एजेएसयुला प्रत्येकी पाच आणि चार जागांवर यश मिळवले आहे.

झारखंड विधानसभा निवडणूक निकालाचे दुपारी दोन वाजेनंतरचे कल बघता काँग्रेस आणि मित्रपक्षांनी बहुमताकडे वाटचाल केली आहे. भारतीय जनता पक्ष ३१ जागांपर्यतच आघाडी घेऊ शकला आहे.

८१ विधानसभेच्या जागा असलेल्या झारखंडमध्ये सत्तास्थापनेसाठी बहुमताचा जादुई आकडा ४१ आहे. कॉंग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाने बहुमत काबीज केले आहे.

झारखंडमध्ये सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा ४१ हा आहे. या मुळे इथे एकेक जागा जिंकणे अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे. सन २०१४ मध्ये आजसू पक्षाबरोबर आघाडी करणारी भारतीय जनता पक्ष यावेळी इथे स्वबळावर निवडणुकीत उतरली होती.

दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चा, आरजेडी आणि काँग्रेसने एकत्रित निवडणूक लढवली आहे. या व्यतिरिक्त, बाबूलाल मरांडी यांचा पक्ष झारखंड विकास मोर्चाने देखील यंदाच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली आहे.

सन २०१४ मध्ये आजसू, जेडीयू आणि एलजेपी या पक्षांसोबत आघाडी करत निवडणूक लढवणारा भाजप यावेळी ‘मात्र एकला चलो रे’ची भूमिका घेत स्वबळावर निवडणुकीत उतरला भाजपची टाकत महाराष्ट्रानंतर झारखंडमध्येही कमी झालेले बघायला मिळत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com