लठ्ठ झाल्याने प्रियकराने सोडले; ५० किलो वजन घटवून ‘ति’ बनली देशातील सर्वात सुंदर मुलगी
स्थानिक बातम्या

लठ्ठ झाल्याने प्रियकराने सोडले; ५० किलो वजन घटवून ‘ति’ बनली देशातील सर्वात सुंदर मुलगी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

आपली प्रेयसी दिवसेंदिवस लठ्ठ होत असल्यामुळे प्रियकराने तिला सोडून दिले होते. अखेर काहीतरी करून सिद्ध होण्याच्या उद्देशाने जेनिफरने दोन वर्षांत ४६ किलो वजन घटवून देशातील सर्वात सुंदर मुलगी होण्याचा मान मिळवला आहे. तिचे नाव जेनिफर एटिक.

जेनिफर मुळची ब्रिटनमधील आहे. ती मिस ग्रेट ब्रिटेन २०२० यावर्षी झाली. लिनकोलनशायर मधील अलकेबी शहरात वास्तव्यास आहे. एखादे यश संपादन केल्याशिवाय दखल घेतली जात नाही असे म्हणतात. जेनिफरला तिच्या प्रियकराने सोडल्यानंतर तिने काहीतरी करून दाखविण्याच्या उद्देशाने खूप मेहनत घेतली.

दोन वर्षांची तिची मेहनत फळाला लागली असून वयाच्या २६ व्या वर्षी हा किताब आपल्या नावे केला आहे. प्रियकराने सोडल्यानंतर जेनिफर खचून गेली नाही. तिने आपल्या डाइटवर लक्ष केंद्रित केले.

तिने जिममध्ये घाम गाळणे सुरु केले. आज ती मिस ग्रेट ब्रिटेन २०२०  बनली आहे. जेनिफर म्हणते की, तिचे जीवन पूर्णपणे बदलून गेले आहे. पहिल्या आणि आताच्या जीवनात खूप अंतर पडले आहे.

खान पान मध्ये खूप बदल केले आहेत. आठवड्यातून पाच वेळा जिम मध्ये वर्कआउट करते. जिम हा माझ्या जीवनातील अविर्भाज्य भाग बनला आहे.

ती म्हणते की,  १०९ किलो असलेले वजन कमी करून ५६ वर आणले आहे. यासाठी एकूण दोन वर्षांचा कालावधी लागला.  जेनिफर मिस स्कनथॉर्प आणि मिस इंग्लंडदेखील २०१८ मध्ये राहिली होती.  मला माझ्या आवडत्या ड्रेसमुळेदेखील वजन कमी करायला भाग पाडले असल्याचे ती सांगते.

Deshdoot
www.deshdoot.com