जामनेर : नेरी दिगरच्या कोरोना संशयीत युवकाचा मृत्यू
स्थानिक बातम्या

जामनेर : नेरी दिगरच्या कोरोना संशयीत युवकाचा मृत्यू

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

कोरोनाने जामनेर तालुक्यात ही धडक दिल्याचे वृत्त असून तालुक्यातील नेरीदिगर गावातील एका चाळीस वर्षे वयाचा कोरोना संशयीत रुग्णाचा जिल्हा कोवीड रुग्णालयात दि.28 रोजी दुपारी 2.30 वाजता उपचार घेत असताना मृत्यू झाला.

प्रशासनाकडून नेरी दिगर व नेरी बुद्रुक असे दोघे गाव पाच दिवस सिल करण्यात येणार आहे. फक्त दवाखाने व मेडिकल या व्यतिरिक्त सर्व बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासन घेत असल्याचे माहिती मिळाली आहे कोरोनाने जामनेर तालुक्यातही धडक दिल्याने भीतीचे वातावरण पसरले असून तालुक्यातील जनतेने घाबरून न जाता खबरदारी घ्यावी व घरीच सुरक्षित रहावे असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

तालुक्यातील नेरी दिगर येथील 40 वर्षीय युवकाला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने कोरोना सदृश्य लक्षणे (घशात खवखव, खोकला, श्वास घेण्यास त्रास,) आढळल्याने दि. 23 रोजी जळगाव जिल्हा कोवीड रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले होते. युवकावर जळगाव कोवीड रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्याचा स्वॅब घेण्यात आल्याची माहिती मिळाली असून मृत्यूचे खरे कारण स्वॅब अहवाल आल्यानंतर समजणार आहे.

या संशयित युवक रुग्णाला पूर्वी क्षयरोग झालेला असल्याचे बोलले जात आहे. आणि यामुळेच त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली होती परंतु मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान या युवकाचा मृत्यू झाला.
जामनेर तालुक्यात पहिलाच कोरोना संशयीत रुग्णाचा मृत्यू झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
युवक राहत असलेला परिसर प्रशासनाच्यावतीने सील करण्याचे काम सुरू झाले असून संशयित रुग्णाच्या संपर्कातील हाय रिस्क व लो रिस्क कॉन्टॅक्ट असणार्‍या लोकांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे . त्याचबरोबर संपूर्ण नेरी दिगर व नेरी बुद्रुक हे दोघे गावे ही पुढील सील करण्यात येणार असून फक्त वैद्यकीय व मेडिकल सेवा वगळता संपूर्ण व्यवहार ठप्प ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात येणार आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com