डंपर-क्रुझर अपघातातील मृतांची संख्या पोहचली बारावर
स्थानिक बातम्या

डंपर-क्रुझर अपघातातील मृतांची संख्या पोहचली बारावर

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

हिंगोणा, ता.यावल । वार्ताहर

भरधाव वेगात असलेल्या डंपरने क्रुझरला धडक दिल्याने काल दि.2 रोजी झालेल्या भीषण अपघातात दहा वर्‍हाडी प्रवासी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या भीषण अपघातातील अन्य जखमींपैकी दोन जणांचा आज मृत्यू झाल्याने अपघातातील मृतांची संख्या 12 वर पोहचली आहे. जखमींपैकी क्रुझर गाडीचा चालक धनराज कोळी व शिवम चौधरी (चिंचोली ता.मुक्ताईनगर) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

येथील यावल-फैजपूर रस्त्यावर मोर कॉलनीजवळ रविवारी रात्री डंपरने दिलेल्या धडकेत क्रुझरचा चक्काचूर झाला असून या अपघातात मंगलाबाई चौधरी या महिलेचा मृत्यू झाला आहे. या गाडीतील लहान-मोठे 14 प्रवासी जखमी झाले. त्यातील तीन जण गंभीर जखमी झाले आहे. अपघातामुळे रात्री 12.30 पर्यंत वाहतूक खोळंबली होती.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चिंचोल मेहूण (ता.मुक्ताईनगर) येथून चौधरी व महाजन परिवारातील सदस्य क्रुझर क्र.(एमएच-19, सीव्ही-1772) या गाडीने चोपडा येथे स्वागत समारंभाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून रात्री घराकडे जात असतांना त्यांच्या गाडीला हिंगोण्याजवळ राख घेवून जाणार्‍या डंपर (एमएच-40, डब्ल्यू-7558) ने जोरदार धडक दिली. यावेळी क्रुझर गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून अपघातात क्रुझरमधील सर्व प्रवासी जखमी झाले आहेत. यात क्रुझरचालक धनराज गंभीर कोळी तसेच बाळू नारायण चौधरी, अश्लेषा उमेश चौधरी, प्रभाबाई बाळू चौधरी, संगिता मुकेश महाजन, सोनाली सचिन महाजन, सोनाली जितेंद्र चौधरी यांचा समावेश आहे. अपघात एवढा जबर होता की, एकमेकांमधे अडकलेली वाहने रात्री 12.30 ट्रॅक्टर व ट्रकच्या मदतीने वेगळी करून क्रुझरचालकाला बाहेर काढण्यात आले. वाजेपर्यंत वेगळी झाली नव्हती. यामुळे क्रुझरचालक गाडीमध्येच अडकून होता. परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य केले. जखमींना भुसावळ येथील धांडे हॉस्पिटल, फैजपूर येथील खाचणे हॉस्पिटल व यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डंपरचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावर असेपर्यंत वाहतूक थांबली होती. अपघातस्थळी डीवाय.एस.पी.नरेंद्र पिंगळे, यावलचे पो.नि.अरूण धनवडे, फैजपूरचे स.पो.नि.प्रकाश वानखेडे, पो.हे.काँ.विनोद पाटील, पो.पा.दिनेश बाविस्कर व ग्रामस्थांनी धाव घेतली होती.

Deshdoot
www.deshdoot.com