Friday, April 26, 2024
HomeUncategorizedकोरोना संशयित दोन रुग्णांचा मृत्यू

कोरोना संशयित दोन रुग्णांचा मृत्यू

जळगाव  – 

जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित दोन रुग्णांचा मृत्यू बुधवारी झाला. यात जळगावातील एका ६५ वर्षीय वृद्ध व जळगाव बाहेरील एका ३० वर्षीय तरुणाचा समावेश  आहे. त्यांना या रुग्णालयात मंगळवारी दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

त्यांना न्युमोनिया, श्‍वसन व इतरही विकार होते. त्यांचे स्वॅब घेवून ते धुळ्यातील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. परंतु, अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.

या रुग्णालयात कोरोना संशयित नऊ रुग्णांना दाखल करण्यात आले. तर संशयित १६ रुग्णांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

३१ अहवाल प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत संशयित २६३ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील संशयित २२८ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. मेहरुणमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे फेरतपासणीतील दोन अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यास बुधवारी घरी सोडण्यात आले.

तर सालारनगरातील एका पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. दोन अहवाल प्रयोगशाळेने तपासणीसाठी नाकारलेले आहे. आतापर्यंत १७९ जणांना होम क्वारंटाइनचा सल्ला दिला आहे.

या रुग्णालयातील स्क्रिनिंग ओपीडीत  बुधवारी १२२ रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले. तर आतापर्यंत ३७५४ जणांचे स्क्रिनिंग झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या