जळगावची वाटचाल कोरोनामुक्तीकडे
स्थानिक बातम्या

जळगावची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

Balvant Gaikwad

एकमेव बाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह

जिल्ह्यात आढळून आलेल्या मेहरुणमधील पहिल्या कोरोना बाधित रुग्णाचा 14 दिवसानंतर घेण्यात आलेल्या फेरतपासणीतील पहिला नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती कोरोना नियंत्रण कक्षाचे समन्वयक डॉ.विलास मालकर यांनी दिली.

या रुग्णाचा चौदाव्या दिवसानंतर जिल्हा रुग्णालयामार्फत घेतलेल्या पहिल्या स्वॅबच्या नमुन्याचा अहवाल धुळे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. याबाबतचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर पंधराव्या दिवसांचा स्वॅब घेवून तो औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. हा अहवाल मात्र प्रतीक्षेत आहे.

पॉझिटिव्ह रुग्णाचे 14 दिवसांनंतरचे किमान दोन अहवाल निगटिव्ह येणे गरजेचे असते. दोन अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्या रुग्णांची प्रकृती त्यास घरी सोडण्यासारखी असल्यास त्याला घरी सोडण्यात येते. त्यानंतर त्या रुग्णास 14 दिवस होम क्वारंटाइन राहणे सक्तीचे असते. यासंदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्या रुग्णावर स्थानिक प्रशासन लक्ष ठेवून असते. त्याच्यावर स्थानिक अथवा महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस लक्ष ठेवून असतात, असेही समन्वयक डॉ.मालकर यांनी स्पष्ट केले आहे.

संशयित दोन मयतांचे अहवाल निगेटिव्ह

जिल्हा रुग्णालयात शनिवारी पहाटे कोरोना संशयित जळगावातील एका बाळाचा व दुपारी सुप्रीम कॉलनीतील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर जिल्हा रुग्णालयातील कोरोना नियंत्रण कक्षात रविवारी सायंकाळी 7 वाजता कांचननगरातील एका कोरोना संशयित 80 वर्षीय वृद्ध महिलेचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, असेही डॉ.मालकर यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com