दिलासादायक : जळगाव जिल्हा कोरोनामुक्त
स्थानिक बातम्या

दिलासादायक : जळगाव जिल्हा कोरोनामुक्त

Balvant Gaikwad

जिल्ह्यात आढळून आलेल्या पहिल्या कोरोना बाधित रूग्णाचा 15 दिवसानंतर घेण्यात आलेला दुसरा नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.त्यामुळे या रूग्णास उद्या कोविड 19 रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

आतापर्यंत प्राप्त झालेल्या सर्व तपासणी अहवालानुसार सध्या जळगाव जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रूग्ण नाही. ही अतिशय महत्वाची व सुखद घटना आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा व आरोग्य यंत्रणेच्या अथक मेहनतीबरोबरच जिल्ह्यातील सर्व माध्यम प्रतिनिधींनी नागरिकांमध्ये केलेल्या जनजागृतीचे व नागरिकांच्या सहकार्याचे हे फळ आहे.

यापुढील लाॅकडाऊनच्या काळातही नागरिकांनी संयम राखून घरातच रहावे. व आपला जिल्हा कोरोना मुक्त राहण्यासाठी आपले बहुमुल्य योगदान द्यावे. असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com