रावेर : दोन दिवसांत ३००० टन केळी घेवून २५० ट्रक रवाना 
स्थानिक बातम्या

रावेर : दोन दिवसांत ३००० टन केळी घेवून २५० ट्रक रवाना 

Balvant Gaikwad

सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊन दरम्यान केळी कापणी थांबली होती,मात्र केळी नाशवंत पिक असल्याने,कापणी झाली नाहीतर शेतकऱ्याचे करोडो रुपयांचे नुकसान होईल,यासाठी स्थानिक आमदार यांच्या पाठपुराव्यानंतर केळी निर्यातीला हिरवा कंदील मिळाला होता.
यामुळे रावेर व सावदा केळी बेल्ट मधून शुक्रवार व शनीवारी दोन दिवसांत १४० व ११० ट्रक केळी रवाना करण्यात आली आहे.रावेर तालुक्याची आर्थिक नाळ केळी निर्यातीवर विसंबून आहे.कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक-डाऊन करण्यात आल्याने केळी कापणी बंद झाल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती होती.
मात्र सरकारच्या सकारात्मक पवित्र्याने केळी नाशवंत असल्याने केळी निर्यातीला राज्य सरकारच्या मध्यस्थीने उत्तर प्रदेश,उत्तखंड,जम्मू काश्मीर,मध्यप्रदेश,हरियाणा,पंजाब मध्ये निर्यात सुरु झाली आहे.
शुक्रवारी रावेर तालुक्यातून १४० ट्रक व शनिवारी ११० ट्रक मिळून सुमारे ३००० टन केळी परराज्यात रवाना  झाल्याची माहिती रावेर बाजार समितीत नोंदण्यात आलेल्या गाड्यावरून मिळाली आहे.
Deshdoot
www.deshdoot.com