Friday, April 26, 2024
HomeजळगावJalgaon Photo Gallery : वाईन शॉप सुरू होताच मद्यपी तुटून पडले

Jalgaon Photo Gallery : वाईन शॉप सुरू होताच मद्यपी तुटून पडले

जळगाव – 

लॉकडाऊनच्या काळात तब्बल दिड महीन्यानंतर दारूची दुकाने मंगळवारी उघडली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मगळवारपासून दारूची दुकाने उघडण्याची परवानगी परवानगी देण्यात आली. मंगळवारी सकाळी 10 वाजता दारूची दुकाने उघडणार हे माहीत झाल्यामुळे मद्यपींनी सकाळी सात वाजेपासूनच दारूच्या दुकानांसमोर मोठी गर्दी केली होती.

- Advertisement -

दरम्यान दुकान कधी उघडेल या प्रतिक्षेने थांबून असलेल्या मद्यपींना दुपारी बारा वाजता कुठे दिलासा मिळाला.सर्व प्रकिया पार पाडल्यानंतर 12 वाजेपासून दारूची दुकाने उघडण्यात आली. दुकाने उघडताच दुकानांसमोर अशरक्षा जत्रा भरली होती. (छाया – योगेश चौधरी )

अनेकांनी महीनाभर पुरेल एवढा दारूचा साठा करुन ठेवला.दरम्यान दारू मिळाल्यामुळे मद्यपींच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. दरम्यान मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी अवाक्याच्या बाहेर गेल्याने काही दुकानदारांनी दुपारी तीन वाजेपासूनच दुकाने बंद केली.

तर अनेक दुकानांमधील साठा अवघ्या एक तासातच संपल्यामुळे अनेक मद्यपींचा ग्लास रिताच राहीला. चित्रा चौकालगतच्या एकावाईन शॉपवर मोठी गर्दी झाल्यामुळे या ठिकाणी पोलीसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान मंगळवारी शहरातील इतर दुकाने देखील मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती.

एकल दुकाने सुरू ठेवण्याचे आदेा असतांना देखील फुले मार्केट व गोलाणी मार्केटमधील अनेक दुकाने सकाळच्या वेळी सुरू झाल्यामुळे गोंधल उडाला. दरम्यान शहरातील कॉम्पलेक्स तसेच व्यापारी संकुले बंद ठेवण्याबाबत आदेश दिलेले असल्यामुळे माकेटमधील दुकाने सुरू होवू शकत नाहीत हे महापालीकेच्या पथकाला दुकानदारांना समजावून सांगावे लागले. त्यानंतर मात्र कॉम्पलेक्स व व्यापारी संकुलातील दुकाने बंद करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या