कृषी विभागातील 80 टक्के रिक्त पदे पूर्ण करणार-कृषी मंत्री दादा भुसे
स्थानिक बातम्या

कृषी विभागातील 80 टक्के रिक्त पदे पूर्ण करणार-कृषी मंत्री दादा भुसे

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

प्रभारी अधिकाऱ्यांच्या जागेवर कायम स्वरूपी अधिकाऱ्यांची 15 दिवसात नेमणूक

योगेश पाटील
पारोळा, जि.जळगाव

कृषी विभागातील जी रिक्त पदे आहेत त्यातील 80 टक्के पदे भरून काढू, त्यामुळे कर्मचारी नाहीत असा प्रश्नच उद्भवणार नाही. तालुक्यातील कृषी अधिकारी व सह्याकांचे जे प्रभारी आहेत त्या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकारीची 15 दिवसात नेमणूक करू असे कृषी मंत्री दादा भुसे यांनी पारोळा येथे आयोजित शिवार पाहणी कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते.

पारोळा तालुक्यातील दळवेल येथे आज भगवान आत्माराम पाटील यांच्या शेतात शिवार पाहणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री दादा भुसे येणार होते सकाळी दहा वाजात कृषी मंत्री यांचे शेतात आगमन झाले यावेळी गावातील मा.सरपंच, जी.प.सद्स्य रोहिदास पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी आमदार चिमणराव पाटील, कृषी विभागाचे नाशिक विभागीय संचालक संजय पळवाळ, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, कृषी विभागीय अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर आदी उपस्थित होते
.

भगवान आत्माराम पाटील यांच्या शेतातील मका पिकाची पाहणी केली व एक तोट्याला दोन, तीन कंसे लागली होती याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली व उपसंचालक अनिल भोकरे यांनी शेतकऱ्याच्या कामाच्या कार्यपद्धती सांगितल्या जिल्हा परिषद सदस्य व दळवेल माजी सरपंच रोहिदास पाटील यांनी शेतरस्ते हे एम.आर.जी.एस. मधून वगळण्यात आले आहे त्यासाठी शेत रस्ते करण्यास अर्थळा निर्माण होतो, पारोळा, अमळनेर, पाचोरा भडगाव ही तालुके डार्क झोन मध्ये आहेत कामे करण्यास अर्थळा येतो ती उठवावी अशी मागणी केली. तसेच शेतकरी यांनी कर्ज माफीबद्दल देखील विचारपूस केली.

यावेळी मंत्री दादा भुसे म्हणाले की, ज्या दिवशी घोषणा झाली त्या दिवसापासून व्याज आकारणी ही बंद झाली आहे तसेच नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील सरकार दिलासा देणार आहे उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक उप समिती नेमली आहे ती पंधरा दिवसात अहवाल देईल व त्यावर मंत्रिमंडळ निर्णय घेईल तसेच डार्क झोन, शेत रस्तेची कामे ही प्रश्न मार्गी लावू, मुख्यमंत्री यांनी दिलेल्या सूचनांवरन ठिबक वरील पाणी योजना, शेततळे, आदी गोष्टीवर जास्तीत जास्त सबसिडी देण्यासाठी सरकारात उपाययोजना सुरू करणार आहेत असे सांगितले.

कृषी मंत्री यांनी अर्धा तास शेतकऱ्यांशी चर्चा केली यावेळी शेतकऱ्यांनी देखील आपल्या किरकोळ अडचणी मंत्र्यांसमोर मांडल्या तसेच यावेळी बंदिस्त शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्याला व छोटे ट्रॅक्टर, रोटाव्हीटर आदी शेतवस्तू शेतकऱ्यांना पोखरा योजने अंतर्गत वाटप करण्यात आले. यावेळी गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. तसेच कृ उ बा मा उपसभापती मधुकर पाटील, चतुर पाटील, सुधाकर पाटील, अमळनेर उप विभागीय अधिकारी दादाराव झंवर प्रभारी तालुका कृषी अधिकारी एस एस बोरसे, कृषी अधिकारी एस.के.राठोड, डी.व्ही.कोसे, आर.आर.पाटील, एस.एम. लांडगे, बी.आर.पाटील, आर.आर.भामरे, निलेश पाटील, बी.के.बोरसे, सर्कल गांगुर्डे, तलाठी प्रशांत निकम आदी शेतकरी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com