निर्मल सिडस्‌ कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १८ लाखांची मदत
स्थानिक बातम्या

निर्मल सिडस्‌ कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १८ लाखांची मदत

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

कोविड-१९ (कोरोना) या विषाणुने संपुर्ण जगभरात थैमान घातले आहे. संपुर्ण मानवजात आज प्रंचड दहशतीखाली आहे. या वैश्विक संकटाला तोंड देण्यासाठी भारत देशसुध्दा सज्ज होऊन जीवाची बाजी लावत आहे.

परंतु देशातील वाढणारा कोरोना विषाणु ग्रस्तांचा आकडा अतिशय चिंताजनक असुन भारतात अनेक बिकट सामाजिक आणि आर्थिक प्रश्न उभे राहिले आहेत.

देशात कोरोना विषाणू या साथरोगाचा संसर्ग टाळण्यासाठी, त्याचा प्रसार थांबविण्या साठी शासन व प्रशासनाकडून युध्द पातळीवर विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे अशा या वैश्विक संकटाच्या काळात शासन व प्रशासनाला पुर्णपणे सहकार्य करणे अतिशय गरजेचे आहे.

निर्मल सिडस्‌ प्रा.लि.पाचोरा या कंपनीतील सर्व अधिकारी व कर्मचारी हे कोरोना विषाणुच्या युध्दात शासन व प्रशासन यांना सहकार्य करण्यासाठी आर्थिक बळ घेऊन समोर आले आहेत. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री मदतीसाठी केलेल्या आवाहानास प्रतिसाद देऊन स्वइच्छेने मुख्यमंत्री सहाय्यता निधी – साठी रुपये १८ लाखाची मदत केली.

उपरोक्त रक्कम माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड १९ या खात्यात आज दि. १६ एप्रिल रोजी जमा करण्यात आली आहे.

सर्वांनी शासन व प्रशासनाच्या सुचनांचा आदर करुन सोशल डिस्टंसिंग पाळुन सहकार्य करावे असे आवाहन निर्मल सिडस्‌च्या माध्यमातुन सर्व जनतेला करण्यात आले आहे .

Deshdoot
www.deshdoot.com