पाच तालुके वगळता जिल्ह्यात मद्याची ऑनलाइन विक्रीला परवानगी
स्थानिक बातम्या

पाच तालुके वगळता जिल्ह्यात मद्याची ऑनलाइन विक्रीला परवानगी

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

कोरोनामुळे देशभरातील सर्वच जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु आहे.  राज्याच्या धर्तीवर कोरोनाबाधित असणारे क्षेत्र वगळता अन्य भागांमध्ये मद्याची ऑनलाईन विक्री सुरू होणार असल्याचा आदेश  जिल्हाधिकार्‍यांनी शुक्रवारी  जारी केले आहेत.

मात्र, यात देशी दारूला वगळण्यात आले आहे. राज्य सरकारने अलीकडेच अटी-शर्तींच्या अधीन राहून ऑनलाईन मद्य विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील काही भागांमध्ये या स्वरूपातील सेवा सुरू करण्यात आली आहे.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यातही ऑनलाईन मद्य विक्रीला परवानगी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधीत असणारे जळगाव, भुसावळ, अमळनेर, भडगाव, चोपडा आदी शहरी हद्दींसह अडावद येथील अपवाद वगळता जळगाव जिल्ह्यातील मद्य विक्रेते आता ऑनलाईन मद्य विक्री करू शकणार आहेत, असेही आदेशात म्हटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com