Friday, April 26, 2024
HomeUncategorizedजिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित नऊ रुग्ण दाखल

जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित नऊ रुग्ण दाखल

जळगाव –

जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित आणखी नऊ रुग्ण रविवारी दाखल करण्यात आले.  सहा जणांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेसाठी पाठवण्यात आले आहेत.

- Advertisement -

तर या रुग्णालयातील कोरोना नियंत्रण कक्षात उपचार सुरू असताना एक बाळ आणि वृद्ध महिलेचा शनिवारी मृत्यू झालेला आहे. त्यांचे नमुने रविवारी देखील प्राप्त न झाल्याने ते कोरोना निगेटिव्ह होते की पॉझिटिव्ह हे रविवारी सायंकाळपर्यंत कळू शकले नाही.

या रुग्णालयात आतापर्यंंत २१७ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यातील १८२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून ३७ अहवाल प्रतीक्षेत आहेत. तर दोन रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी नाकारण्यात आले होते. डॉक्टरांनी एकूण १४५ जणांना होम क्वॉरंटाइनचा सल्ला दिला आहे.

रुग्णालयातील स्क्रिनिंग ओपीडीत रविवारी ८८ रुग्णांची तपासणी झाली. तर आतापर्यंत ३४०६ रुग्णांची स्क्रिनिंग झाले आहे.

या रुग्णालयात आतापर्यंत दोन रुग्ण पॉझिटीव्ह आले. त्यातील मेहरुणमधील पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू आहे. त्याचे दुसर्‍या टप्प्यात शुक्रवारी स्वॅब घेण्यात आले. मात्र, अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. तसेच सालारनगरातील एका पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या