जळगाव : निलम वाईन्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द
स्थानिक बातम्या

जळगाव : निलम वाईन्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द

Balvant Gaikwad

लॉकडाऊनच्या काळात दारूविक्रीवर बंदी असताना देखील दारूसाठ्यात तफावत आढळून आल्याप्रकरणी माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावे असलेल्या निलम वाईन शॉपचा विक्री परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी गुरुवारी रात्री काढले आहेत.

शहरातील चित्रा चौकात असलेल्या निलम वाईन शॉपवर लॉकडाऊनच्या काळात अवैध दारूविक्री होत असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर भरारी पथकाने छापा घालून तपासणी केली असता, विक्री व शिल्लक नोंदवहीत खाडाखोड आढळून आली होती.

त्यासोबतच मद्यसाठ्यात तफावत आढळण्यासोबतच कालबाह्य झालेला मद्यसाठा देखील आढळून आला होता. या प्रकरणी भरारी पथकाने सादर केलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी निलम वाईन शॉप या दारू विक्री दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com