जळगाव : आठ पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना सन्मानचिन्ह जाहीर
स्थानिक बातम्या

जळगाव : आठ पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना सन्मानचिन्ह जाहीर

Balvant Gaikwad

जिल्हा पोलीस दलातील आठ पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना त्यांच्या विशेष उल्लेखनीय कामगिरीमुळे पोलीस महासंचालकांकडून सन २०१९ या वर्षासाठीचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहेत. त्यांना शुक्रवारी, १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विशेष समारंभात हे सन्मानचिन्हे देवून सन्मान करण्यात येईल. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सन्मानार्थी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांची यादी जाहीर झाली आहे.
जळगाव जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस उपअधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस उपनिरीक्षक व तीन  हवालदारांची पोलीस महासंचालक सन्मानचिन्हासाठी निवड झाली आहे.

यात,

जळगाव जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील  पोलीस उपअधीक्षक गोपाल महादू ठाकूर (पोलीस दलात १५ वर्षे सतत उत्तम कामगिरी),

राज्य गुप्तवार्ता विभागाचे जळगाव पोलीस निरीक्षक राजेश रमेश भागवत (विशेष शाखेत उत्तम कामगिरी),

पोलीस निरीक्षक विनायक पांडुरंग लोकरे (नक्षलवाद्यांविरुद्ध पोलीस दलाने केलेल्या कारवाईत उल्लेखनीय कामगिरी),

सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पंढरीनाथ चांदेलकर (पोलीस दलात १५ वर्षे सतत उत्तम कामगिरी),

सहायक पोलीस उपनिरीक्षक भास्कर पांडुरंग कुलकर्णी (पोलीस दलात १५ वर्षे सतत उत्तम कामगिरी),

पोलीस हवालदार विठ्ठल पंडित देशमुख (पोलीस दलात १५ वर्षे सतत उत्तम कामगिरी),

पोलीस हवालदार अनिल राजाराम इंगळे (पोलीस दलात १५ वर्षे सतत उत्तम कामगिरी),

पोलीस हवालदार सुनील भाऊराव चौधरी (पोलीस दलात १५ वर्षे सतत उत्तम कामगिरी)

यांचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com