जळगावात गुटखाप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
स्थानिक बातम्या

जळगावात गुटखाप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

इच्छादेवी चौफुली परिसर आणि सिंधी कॉलनी समोरील भागात दोन जणांना गुटखा विक्री प्रकरणी पोलिसांनी २२ रोजी दुपारी पकडले. त्यांच्याकडून सुमारे चार हजार रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी पकडला. दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

इच्छादेवी चौफुली परिसरातील रस्त्यावर एक जण मोटारासायकल (क्र.एमएच १९ बी १७७९) वर दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास एका पिशवीत संशयास्पदरित्या काही तरी घेवून जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यास पोलिसांनी हटकले असता त्याने मोटारसायकलचा वेग वाढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यास पोलिसांनी पकडले.

पोलिसांनी चौकशी केली असता त्या व्यक्तीचे नाव शांताराम चुडामण गावंडे (वय ३२, समतानगर) असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या मोटारसायकलवरील पिशवीत ६६० रुपये किमतीचा राज निवास सुगंधित पान मसाला गुटखा आढळला. तर १६५ रुपये किमतीची एन पी-०१ जाफरानी जर्दा सापडली.

पोलिसांनी हा गुटखा कोठून आणला? याबाबत शांताराम गावंडे यास विचारणा केली. त्याने हा गुटखा सिंधी कॉलनी समोरील   गिरीश राजेमलदास खानचंदाणी याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस त्या ठिकाणी पोहचले. त्या ठिकाणी   पिशवी घेवून उभा असलेल्या गिरीश राजेमलदास खानचंदाणी (वय ४०, रा.डी.मार्टजवळ, आदर्शनगर) यास पोलिसांनी पकडले.

त्याच्या पिशवीत १९८० रुपये किमतीचा राज निवास सुगंधित पान मसाला व ४९५ रुपये किमतीचा प्रिमियम एन पी ०१ जाफरानी जर्दीचे पाकीट आढळले. याबाबत कॉन्स्टेबल सचिन किरण पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गावंडे व खानचंदाणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com