पीएसआय पतीने पत्नीवर झाडली गोळी
स्थानिक बातम्या

पीएसआय पतीने पत्नीवर झाडली गोळी

Balvant Gaikwad

कौटुंबिक वादातून गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षक धनराज बाबूलाल शिरसाठ (वय ३४, मूळ रा.मुसळी, ता. धरणगाव) याने जळगावातील लक्ष्मीनगरातील माहेरवाशिण असलेली पत्नी संगीता शिरसाठ हिच्यावर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

घरात प्रत्यक्षदर्शी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाची सात वर्षीय मुलगी भार्गवी हिने जळगावातील मामा गणेश सपके यास मोबाईलवरुन संपर्क साधला आणि रडत रडतच मामा, पप्पाने मम्मीच्या डोक्यात बंदुकीने गोळी मारल्याची माहिती दिली.

या घटनेत संगीता धनराज शिरसाठ (वय २८) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांचा भाऊ गणेश सपके याने सांगितले.

वर्षभरापासून धनराज व संगीता यांच्यात वाद सुरु आहे. संगीता हिचे माहेरची मंडळी संबंधित शासकीय कार्यालयात जावून मुलचेरा येथे जाण्यासाठी आवश्यक पास मिळवली. त्यानंतर  संगीताचे कुटुंबीय मुलचेराकडे रवाना झाले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com