भुसावळ : रेल्वे स्थानकावरून परप्रांतीयांसाठी पहिली एक्सप्रेस धावली 
स्थानिक बातम्या

भुसावळ : रेल्वे स्थानकावरून परप्रांतीयांसाठी पहिली एक्सप्रेस धावली 

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव, धुळे , बुलढाणा येथील परप्रांतीयांचा समावेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  लाकडांऊनमध्ये प्रथमच भुसावळ रेल्वे स्थानक वरून भुसावळ ते लखनऊ साठी जळगाव ,धुळे, बुलढाणा च्या परप्रांतीयांसाठी थेट लखनऊ पर्यंत श्रमिक एक्सप्रेस धावली.
लाँक डाउन घोषित झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यासह धुळे, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये अनेक परप्रांतीय मजूर अडकले होते सातत्याने  लाँकडाऊन  मध्ये वाढ करण्यात आली परप्रांतीयांसाठी  कुठलीही जाण्याची व्यवस्था करण्यात न आल्यामुळे मजूर मार्गांनी पायीच आपापल्या राज्याकडे मार्गक्रमण सुरु केले होते. याची केंद्र व राज्य शासनाने गंभीर दखल घेत तब्बल दीड महिन्यानंतर एक्स्प्रेस गाड्यांना सुरुवात केली .
भुसावळ रेल्वे स्थानकावरून ६ रोजी संध्याकाळी ६:४० वाजता फलाट क्रमांक ७ वरून गाडी क्रमांक ०१९११ भुसावळ- लखनऊ श्रमिक एक्स्प्रेस रवाना झाली या गाडी मध्ये  २४कोच जोडण्यात आले. यात यात १८ स्लीपर क्लास, ४ सामान्य व दोन एसएलआर कोच जोडण्यात आले .
तब्बल  १ हजार २९२ प्रवासी लखनऊ साठी रवाना झाले, दरम्यान रेल्वेस्थानकावर कुठलाही गोंधळ होऊ नये याकरिता आरपीएफ जवान तसेच लोहमार्ग पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच दीड मीटरच्या अंतरावर गोलाकार वर्तुळ करून प्रवाशांना बसविण्यात आले होते, सोशल डिस्टन्सिंग चा तंतोतंत पालन करण्यात आले, गाडी सुटण्यापूर्वी  सँनीटायझर  करण्यात आली.
प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू
तब्बल दीड महिन्यानंतर अडकलेले परप्रांतीय हे आपल्या राज्यात, आपल्या गावात जाणार, अनेक दिवसांची पायी भ्रमंती थांबणार. आपल्या कुटुंबियांना भेटणार असे बोलके चित्र प्रत्येक प्रवासाच्या चेहऱ्यावर दिसून येत होते  अनेक वयोवृद्ध प्रवास्याच्या डोळ्यातुन गाडीत बसल्यानंतर आनंदाश्रू आले व त्यांनी रेल्वे प्रशासनाचे ऋण व्यक्त केले.
प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे ,प्रांत रामसिंग सुलाने, डीआरएम विवेक कुमार गुप्ता, तहसीलदार दीपक धिवरे, स्टेशन निर्देशक जी आर अय्यर, मुख्य वाणिज्य निरीक्षक सुदर्शन देशपांडे, खानपान विभागाचे शकील खान, तिकीट निरीक्षक अकील शेख, धुळे बुलढाण्याचे अधिकारीवर्ग प्रसंगी उपस्थित होते.
Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com