माजी महापौर ललित कोल्हे यांना अटक 
स्थानिक बातम्या

माजी महापौर ललित कोल्हे यांना अटक 

Balvant Gaikwad

बांधकाम व्यावसाईक खुबचंद साहित्या यांचेवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांना बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे .
गेल्या काही महिन्यांपूर्वी शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसाईक खुबचंद साहित्या यांचेवर शहरातील व.वा.वाचनालयाजवळील गोरजाबाई सोशल क्लब वर रात्रीच्या वेळी जीवघेणा हल्ला झाला होता या प्रकरणी 8 जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .
गुन्हा दाखल असल्यापासून माजी महापौर ललित कोल्हे हे फरार होते .या प्रकरणी बांधकाम व्यवसाईक साहित्या यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली होती .
बुधवारी सायंकाळी कोल्हे हे शहरातील महाबळ भगात आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कोल्हे यांना अटक केली .रात्री उशिरापर्यंत याबाबत कार्यवाही सुरू होती
Deshdoot
www.deshdoot.com