Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedधानोरा येथे अपघातात एक जण जागीच ठार

धानोरा येथे अपघातात एक जण जागीच ठार

अंकलेश्वर – बऱ्हाणपूर महामार्गावर धानोरा येथील यश हॉटेल जवळ स्विफ्ट डिझायर गाडी क्र. एम.एच.१९  सी.एफ. २२९६  च्या चालकाचा ताबा सुटल्याने गाडी झाडावर धडकली या अपघातात फैजपूर येथील सुधीर भास्कर महाले वय ३५ हे जागीच ठार झाले .
सुधीर महाले हे फैजपूर येथून सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आपल्या पत्नीला घेण्यासाठी अंमळनेर येथे जात होते . धानोरा येथील हॉटेल जवळ त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी चिंचेच्या झाडावर धडकली त्यानंतर गाडीने तीन पलट्या मारल्यामुळे गाडीमधील सुधीर महाले यांना गंभीर दुखापत झाली. असून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर पं.स. सदस्य सुर्यकांत खैरनार, डॉ.तेजभुषण चौधरी , देविदास महाजन यांनी मृतदेह गाडीच्या बाहेर काढला. सदर घटनेची माहिती होताच अडावद पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. योगेश तांदळे , गोपनीय विभागाचे योगेश गोसावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला .
पुढील तपास आडावद पोलिस स्टेशनचे ए.पी.आय.योगेश तांदळे करीत आहे. सुधीर महाले हे चोपडा पंचायत समितीचे ओ.एस. प्रदीप सपकाळे यांचे जवाई आणि निंभोरा येथील पत्रकार भास्कर महाले यांचे सुपुत्र होते.
त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ , वहिनी, पुतण्या, पत्नी व मुलगा आहे. त्यांच्यावर निंभोरा बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.
- Advertisment -

ताज्या बातम्या