जळगाव : दूरदर्शन टॉवरजवळ कंटेनरने महिलेला चिरडले ; महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला जीव
स्थानिक बातम्या

जळगाव : दूरदर्शन टॉवरजवळ कंटेनरने महिलेला चिरडले ; महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला जीव

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

अंबुलन्स तासभर न आल्याने मृतदेह जागेवरच

जळगाव –

जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या दूरदर्शन टॉवरजवळ आज सकाळी १०.१५ वा. झालेल्या अपघातात कंटेनरने ५० वर्षीय महिलेला चिरडल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर असे की, भुसावळ उस्मानीया कॉलनीतील रहिवाशी शेख चाँद शेख उस्मान (वय ६०) व नजमाबी शेख चाँद (वय ५०) हे दाम्पत्य ॲटीव्हा टूव्हीलर  क्र. एम.एच.- ७१७९ ने भुसावळ येथून जळगावकडे जात असताना दूरदर्शन टॉवरजवळ हरियाना पासिंगचे कंटेनरने धडक दिल्याने हे दाम्पत्य कोसळले व त्यात नजमाबी शेख चाँद ही महिला कंटेनरच्या चाकाखाली आली व चिरडल्या गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर पती शेख चाँद शेख उस्मान हे जखमी झाले.

ॲब्युलन्सची प्रतिक्षा

घटना घडताच महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी अंबुलन्स बोलावण्याचा प्रयत्नही केला मात्र घटना घडून एक तास झाला तरी घटनास्थळी अंबुलन्स न पोहचल्याने सदर महिलेचा मृतदेह जागेवरच पडून होता.

शहर वाहतुक अधिकाऱ्यांची भेट

जळगाव शहर वाहतुक पोलीस अधिकारी एपीआय श्री.कुनगर व पीएसआय दिलीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत झालेली वाहतुकीची कोंडी दूर करत अंबुलन्स बोलवून प्रेत शासकीय रूग्णालयात रवाना केले. तसेच नशिराबाद पोलीस ठाण्याचे सपोनी प्रविण साळुंखे यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

मुलाचे भान हरपले

अपघाताचे वृत्त नातेवाईकांना कळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली यात त्यांचा जळगाव येथे राहणारा मुलगा पोहचताच आईचा मृतदेह बघून त्याचेही भान हरपले होते.

नजमाबी यांना त्यांचे पती शेख चाँद शेख उस्मान हे जळगाव येथे दवाखान्यात नेत होते शेख चाँद हे रेल्वेत कर्मचारी असून त्यांची या महिनाअखेर सेवानिवृत्ती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खड्ड्यांनी घेतला बळी

जळगाव-नशिराबाद दरम्यान महामार्गावर अनेकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेक अपघात होऊन अनेकांचा बळी घेतला आहे. आजही खड्ड्यांमुळेच हा बळी गेल्याचे घटनास्थळी जमलेल्या जमावाने संताप व्यक्त केला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com