स्थानिक बातम्या

सुप्रिम कॉलनीत वृद्धाचा मृत्यू

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

सुप्रिम कॉलनीतील रामा देवचंद डोळसे (वय ६५) यांचा रविवारी दुपारी ३.४५ वाजेपूर्वी घरात मृत्यू झाला.
रामा डोळसे हे धानवड (ता.जळगाव) येथील मूळ रहिवासी होते.

ते गेल्या सात ते आठ महिन्यात सुप्रिम कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होते. ते हातमजुरी अथवा मिळेल ते काम करुन उदरनिर्वाह करीत होते.

त्यांचा सकाळपासून काही आवाज अथवा संपर्क नसल्यामुळे त्यांच्या पार्टीशनच्या झोपडीत शेजारील मुकेश नानाजी खडसे यांनी डोकावून पाहिले. तेव्हा रामा डोळसे मृत स्थितीत आढळले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

परंतु, त्यांचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप पाटील यांनी खबर दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तपास नाईक नीलेश भावसार करीत आहेत.

दरम्यान, रामा डोळसे यांच्या घऱात त्यांचे आधारकार्ड व काही नातेवाईकांचा मोबाइल संपर्क नंबर शेजार्‍यांना सापडला. या घटनेबाबत शेजारच्यांनी वृद्धाचे नातेवाईक आणि धानवड येथील सरपंचांना कळवले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com