जळगाव : भरदिवसा हॉटेल चालकाचा खून

जळगाव : भरदिवसा हॉटेल चालकाचा खून

जळगाव –
शहरातील नेरीनाका परिसरात असलेल्या असोदा मटन हॉटेलवर आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास धुडगूस घालण्यासाठी आलेल्या तरुणांनी काचेच्या बाटलीने गळा चिरून हॉटेल मालकावर केलेल्या हल्ल्यात हॉटेल मालक प्रदीप चिरमाडे यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेत तीन ते चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिरमाडे हे नेरी नाक्यावरील आपल्या असोदा मटन हॉटेल येथे असताना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मद्यप्राशन केलेले तीन तरुण धुडगूस घालण्याच्या उद्देशाने हॉटेलमध्ये आले.

त्यांनी येथे असलेल्या काही ग्राहकांसह हॉटेलवर काम करणार्‍यांवर काचेच्या बाटल्यांनी हल्ला चढविला. हॉटेल मालक प्रदीप चिरमाडे त्यांना प्रतिकार करीत असताना त्यांचा गळा काचेच्या बाटलीने चिरला गेल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com