जळगावचा शशांक अत्तरदे मुंबईच्या रणजी संघात

जळगाव । 

जळगातील युवा क्रिकेट खेळाडू शशांक अत्तरदे याची मुंबईच्या रणजी संघात निवड झाली आहे. अजिंक्य राहणे, पृथ्वी शॉसोबत शशांक मुंबई संघातून खेळणार आहे . 

बडोदा संघाविरुद्ध 9 ते 12 डिसेंबर दरम्यान होणार्‍या रणजी सामन्यासाठी मुंबईचा संघ जाहील झाला. या संघात जळगावचा शशांक अत्तरदे आहे. संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादव असून उपकर्णधार आदित्य तारे आहे.

संघात अजिंक्य राहणे, पृथ्वी शॉ, जय बिस्ते, शुभव रंजन, आकाश पारकर, सरर्फराज खान, शाम मुलानी, विनयकुमार भोर, शशांक अत्तरदे, श्रादुल ठाकूर, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, एकनाथ केळकर यांचा समावेश आहे.

शशांक विनायक अत्तरदे हा जळगावमधील ला. ना. सार्वजनिक विद्यालयाचा विद्यार्थी. जैन  आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली.

जैन स्पोर्ट्स अकादमीने त्याला दत्तक घेतले, बाहेती कॉलेज तर्फे विद्यापीठ स्पर्धेत शशांकने सहभाग घेतला.मधल्या फळीचा उत्तम फलंदाज व उत्तम ऑफ स्पिन गोलंदाजी हे त्याची खासियत जळगांव जिल्हा क्रिकेट संघाचा कर्णधार व त्यानंतर महाराष्ट्र प्रीमिअर लीग मध्ये सिंहगड सुप्रीमो या जैन इरिगेशन च्या मालकीच्या संघाचा खेळाडू व पुढे जैन इरिेगेशन कंपनी तर्फे मुंबई येथील प्रतिष्ठेच्या टाईम्स शील्ड स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने प्रथम मुंबईच्या संघात टी 20 स्पर्धेसाठी प्रवेश मिळविला. नंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सिनिअर गटातील विविध संघा द्वारे खेळत आपल्या खेळातील कौशल्यामुळे व सातत्यपूर्ण कामगिरी द्वारे आता तो मुंबईच्या मुख्य रणजी संघात निवडला गेला आहे


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *